Skip to main content
  • पोस्ट ऑफिसमधील मासिक उत्पन्न योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवून दर महिन्याला ठरावीक उत्पन्न मिळवू शकता.
  • पोस्ट ऑफिसमध्ये एकरकमी ठराविक रक्कम गुंतवल्यास दरमहा निश्चित रक्कम मिळते. यात पती पत्नी ज्वाइंट अकाउंट खोलू शकतात.
  • एप्रिल 2023 पासून सरकार मासिक उत्पन्न योजनेसाठी 7.4 टक्के व्याज मिळते.या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे.
  • एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला सलग पाच वर्षे दर महिन्याला निश्चित रक्कम मिळेल. या योजनेअंतर्गत, तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवू शकता.
  • या योजनेत तुम्ही 5 लाख गुंतवल्यास तुम्हाला महिन्याला 3,084 व्याज मिळेल. मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालकत्व असलेली व्यक्ती त्याच्या नावावर खाते उघडू शकतात.
  • तुम्ही हे व्याज मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आधारावर मिळवू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते उघडू शकता.