Skip to main content

Prajakta Mali New Marathi Movie Teen Adkun Sitaram : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram) असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर शेअर करत तिने खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,”हे तीन जण तर मजबूत अडकलेत आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायत कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच… ‘तीन अडकून सीताराम’ 29 सप्टेंबरपासून फक्त चित्रपटगृहात”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा, चला लंडनमधील शूट अखेर प्रेक्षकांसमोर येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘तीन अडकून सीताराम’ कधी प्रदर्शित होणार? (Teen Adkun Sitaram Release Date)
प्राजक्ता माळीचा बहुचर्चित ‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा येत्या 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तीन अडकून सीताराम’ हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ प्रेक्षकांना हा सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. हटके नाव आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.

‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांनी सांभाळली आहे. हृषिकेश जोशी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या सिनेमाचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘दुनिया गेली तेल लावत’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या सिनेमातही प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा असा विनोदी सिनेमा म्हणजे ‘तीन अडकून सीताराम’ : हृषिकेश जोशी
‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमाबद्दल बोलतना हृषिकेश जोशी म्हणाले,”संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा, असा ‘तीन अडकून सीताराम’ हा विनोदी सिनेमा आहे. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल. एकंदरीतच सिनेमाची संपूर्ण टीम भारी आहे. हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच”.