Skip to main content

वडाळा बहिराबा(ता. नेवासा) येथील शेतकर्‍याला मारहाण करून डाळिंब चोरणार्‍यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारेगाव (ता. नेवासा) येथून जेरबंद केले. गुन्ह्याच्या तपासाकामी त्यांना शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. साईनाथ बाबुराव आहिरे (रा. कोरगाव, ता. नेवासा), नवनाथ सोमनाथ गवळी (रा. आंतरवली, ता. नेवासा), अक्षय दिलीप आहेर (वय 22), लालू बाबुराव आहिरे (वय 30), वाल्मिक बबन आहिरे (वय 22, तिघे रा. चितळी, ता. पाथर्डी), नानासाहेब चांगदेव बर्डे (वय 30), प्रल्हाद शंकर पवार (वय 40), विठ्ठल सोपान बर्डे (वय 30, तिघे रा. कोरगाव, ता. नेवासा), आकाश पोपट माळी (पसार), एक विधीसंघर्षीत बालकाचा आरोपीमध्ये समावेश आहे.