Skip to main content

Most Expensive Tree : महागडं लाकूड म्हणून लोकांना आफ्रिकन ब्लॅकवुड, चंदन किंवा सागवान याबद्दल माहित आहे. पण, जगातील सर्वात महाग झाड कोणतं हे फार कमी लोकांना माहीत असेल. या झाडाची किंमत तुमच्या अंदाज आणि कल्पनेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. आफ्रिकन ब्लॅकवुडची किंमत कोटींमध्ये आहे. मात्र, कोटींच्या किंमतीत असणारं हे एकमेव झाड नाहीये. तर, आणखी एक लहान झाड आहे जे 10 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले आहे. विशेष म्हणजे या झाडाचं वय वाढलं की त्याची किंमतही वाढते.

सर्वात महाग बोन्साय झाड 10.74 कोटींना विकले गेले

जपानच्या बोन्साय वृक्षाची किंमत काही हजारांपासून ते कोटी रुपयांपर्यंत असू शकते. जपानमधील ताकामात्सू येथे आतापर्यंतचे सर्वात महागडे बोन्साय ट्री $1.3 लाख ते 10.74 कोटी रुपयांना विकले गेले आहे. बोन्साय झाड एका लहान कुंडीत वाढवता येते आणि त्याची उंची 2 साधारण फुटांपर्यंत असते.

फळ किंवा लाकूड देत नाही

या झाडाला फळं येत नाहीत किंवा त्याच्या लाकडाचाही एखादं वाद्य किंवा फर्निचर बनवण्यासाठी वापर केला जात नाही. तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटलं असेल की हे झाड इतकं महाग कसं? खरंतर, बोन्सायकडे झाड म्हणून नाही तर एक कला म्हणून पाहिले जाते. तुम्ही याचा विचार एखाद्या महागड्या पेंटिंगप्रमाणे करू शकता. ज्या प्रमाणे सुंदर पेटींग पूर्ण होण्यासाठी कलाकृती घडवून आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. हे झाडही अगदी तसंच आहे.

बोन्सायच्या झाडाचा वापर घराच्या सजावटीसाठी केला जातो

आजही तुम्हाला 300-400 वर्ष जुनी बोन्साय झाडं पाहायला मिळतील. मात्र, इतकी वर्ष जिवंत असूनही ही झाडं आपली मुळे आणि फांद्या फारच कमी भागात पसरवतात, त्यामुळे घराच्या सजावटीसाठी हे सर्वोत्तम कलाकृती मानली जाते. तुम्ही 1000-2000 रुपयांना लहान आणि नवीन बोन्साय ट्री खरेदी करू शकता.

जपानमधून प्रसिद्ध झालं

जगभरात शेकडो वर्ष जुनी बोन्साय झाडे उपलब्ध आहेत आणि तज्ञांच्या अहवालानुसार 800 वर्ष जुनी बोन्साय झाडे देखील आहेत. या कलेची उत्पत्ती खरंतर चीनमधून झाली परंतु ही झाडं प्रसिद्ध मात्र, जपानमधून झाली.

खास पद्धतीने वाढवले जाते

बोन्साय वृक्ष वाढवणारे लोक म्हणतात की, ही एक कला आहे आणि ती शिकण्यासाठी अनेक वर्ष लागतात. हे झाड भांड्यात ठेवण्यासाठी कापणी, छाटणी, वायरिंग, रिपोटिंग आणि ग्राफ्टिंग आवश्यक आहे. एकाच ठिकाणी बरीच बोन्साय झाडे ठेवल्याने ते लहान जंगलासारखे दिसू शकतात. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रकाराचे एक चित्र लाखोंना विकले जाऊ शकते, त्याचप्रमाणे बोन्साय ट्री ही देखील शतकानुशतके जुनी कला आहे जी त्याच्या वयानुसार खूप मोलाची असू शकते.